चंदगड प्रतिनिधी : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही इच्छाशक्तीच्या जोरावर त्यावरही मात करून आपल्याला आवडत्या क्षेत्रात प्रगती करता येते.त्यासाठी विद्यार्थ्यांनी जागृत होऊन ध्येयपूर्तीसाठी झगडले पाहिजेत असे मत माजी आयपीएस अधिकारी,व नाबार्डचे विद्यमान विभागीय प्रबंधक विकास राठोड यांनी व्यक्त केले.ते चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयात कॉमर्स व अकाउंटसी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून करिअरचा विकास या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ.एस. डी.गोरल होते.
राठोड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी पदवी पर्यंतचे बेसिक शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी नियोजनबद्ध कठोर परिश्रम घेणे गरजेचे असून स्वतःमधील क्षमता ओळखून कार्यरत राहायला हवे. यासाठी अभ्यासाचे नेमके तंत्र विकसित करणे गरजेचे आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की, अपयशाला घाबरून प्रयत्न सोडता कामा नये, करिअर साठी अतिशय गांभीर्याने वेळ द्यायला हवा यासाठी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांनी वाचनालयात जाऊन वाचन वाढवणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.प्रारंभी प्रास्ताविक अकाउंटसी विभाग प्रमुख प्रा. एस. के. सावंत यांनी करून विकास राठोड च्या जिद्दीचे कौतुक केले.
अध्यक्ष भाषणात बोलताना डॉ. गोरल म्हणाले की,अतिशय खडतर परिस्थितीमध्ये विकासने गाठलेल्या ध्येयाचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक जोमाने आपापल्या क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन केले. यावेळी प्राचार्य डॉ गोरल यांच्या हस्ते विकास राठोड यांचा सत्कार करण्यात. प्रा. ए. डी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. टी ए.कांबळे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे विकास राठोड यांनी दिली.
या कार्यक्रमाला डॉ. जी. वाय कांबळे, प्रा. व्ही.के गावडे, डॉ. एस एस सावंत, प्रा.आर के तेलगोटे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments