चंदगड/प्रतिनिधी : गेल्या कित्येक दिवसापासून चंदगड तालुक्यातील हेरे भागात हत्तींचा सतत वावर असून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले जात आहे.मागच्या आठवड्यात,गुरुवारी सकाळी कळपातून वाट चुकून बाहेर पडलेल्या एका हत्तीने सुमारे ५ एकर क्षेत्रातील ऊस पिकाची नासाडी केली. दिवसभर हत्ती या क्षेत्रात धुडगूस घालीत होता.हत्तीला पाहण्यासाठी जशी गर्दी वाढली, तसा हत्ती अधिकच बिथरला.गुरूवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पाटणे गावाकडून हत्ती हेरे येथील नागनाथाच्या मंदिराशेजारील उसातून शिरत नासधूस केल्याची माहिती मिळाली.तिथे हत्तीने संजय सावंत, संजय पाटकर, भाऊ सावंत, बाळासाहेब देसाई या आदी शेतकऱ्यांचे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.यावेळी हत्तीला पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली.त्यानंतर वनविभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.
हत्तीला हुसकावून लावण्यासाठी सुतळीचे बॉम्ब वाजवले. त्या बॉम्बमुळे उसालाच आग लागून उसाचे पाचट जळाले. या आगीने हत्ती अधिकच बिथरला आणि लोकांची गर्दी वाढत गेली.पण हत्ती दिवसभर ऊसातच नाचत राहिला. त्यामुळे वरील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हेरे परिसरात हत्ती तसेच गव्यांच्या वाढत्या वावराने शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
16 एप्रिल 2025 चे बुकिंग सुरू
(3 हजार रुपये भरून, आजच आपली सीट बुकिंग करा.)
Post a Comment
0 Comments