Type Here to Get Search Results !

श्री.महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय वतीने हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न.

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : पारपोली येथील श्री.महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय वतीने हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात पार पडल्या.सदर स्पर्धा डी.एस. बी. डेळेकर यांनी आयोजित केली होती.उद्घाटन प्रकाश शेटगे यांनी केले.वाचनालयाच्या फलकाचे पूजन सुचिता शेटगे व सरिता मालव यांच्याहस्ते झाले तर दिपप्रज्वलन - अशोक मालव व अर्जुन शेटगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  प्रकाश शेटगे,अमरजीत नारायण ढोकरे यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.स्पर्धेचे पर्यवेशक म्हणून नितीन राऊत  यांनी काम पाहिले.स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


लहान गटात - 

स्वरा शेटगे - प्रथम 

ऋग्वेद ढोकरे - द्वितीय

अंकिता गुरव - तृतीय 

पारस शेटगे व आयुष शेटगे - चतुर्थ आदींनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले.

मोठा गट यामध्ये - 

सायली शेटगे - प्रथम 

आकांशा शेटगे - द्वितीय 

समृद्धी ढोकरे - तृतीय 

संग्राम शेटगे - चतुर्थ आदींनी क्रमांक प्राप्त केले.

विजेत्यांना प्रमाणपत्र व आकर्षक पेन देण्यात आले.तसेच सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र व पेन देण्यात आली.

यावेळी अशोक मालव, मारुती शेटगे, संदीप मिटके, चंद्रकांत शेटगे, सुरेश ढोकरे, अर्जुन शेटगे, सचिन कांबळे, सिद्धार्थ कांबळे, शुभम शेटगे आदी उपस्थित होते.सूत्र संचालन डि.एस. बी. डेळेकर तर नितीन राऊत यांनी आभार मानले.





Post a Comment

0 Comments