नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : कोळींद्रे ता.आजरा येथील माजी सैनिक संतोष देसाई यांची कन्या विनया संतोष देसाई हिने जिल्हास्तरीय सुगम गायन स्पर्धेत विविध क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी प्राप्त केलेबद्दल तिचेवर गावासह तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सदर स्पर्धा गंगामाई वाचन मंदिर आजरा वतीने घेतली होती.विनया देसाई सद्या स्वर साधना शास्त्रीय संगीत विद्यालय गडहिंग्लज येथे संगीत शिक्षण घेत आहे.यासाठी तिला गुरुवर्य- मच्छिंद्रबुवा गिरी यांचे मार्गदर्शन तर वडील संतोष देसाई माजी सैनिक,आई - सौ.आनंदी संतोष देसाई,बहीण - कु.सिया.यांचे प्रोत्साहन लाभले आहे.सध्या तिच्या या यशानंतर विविध मान्यवर व संस्थांच्या वतीने तिचा सत्कार होत आहे.
Post a Comment
0 Comments