चंदगड प्रतिनिधी : चंदगड येथील ग्रामदैवत श्री.देव रवळनाथ देवालयाची वार्षिक यात्रा बुधवार दि. १९ रोजी होत असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीमार्फत 'करण्यात आले आहे.रवळनाथ देवालयाच्या यात्रेचा मुख्य दिवस बुधवार दि. १९ फेब्रुवारी असला तरी मंगळवार दि. १८ ते २३ फेब्रुवारी २०२५ अखेर अशी सहा दिवस यात्रा चालणार आहे. चंदगड तालुक्यासह तळकोकण, बेळगाव, खानापूर येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री देव रवळनाथ देवालयाची वार्षिक यात्रोत्सवास मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे.
मंदिर परिसराबरोबर देवदेवतांच्या मूर्त्यांची स्वच्छता, दुकानै, पाळणे व भविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रवळनाथ देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले आहे. श्री देव रवळनाथ वार्षिक यात्रां सालाबादप्रमाणे दि. १८ फेब्रुवारी ते दि.२३ पर्यंत आहे.मंगळवार दि. १८ रोजी लघुरूद्र, अभिषेक, गोंधळ, महाप्रसाद, रात्री गोंधळाची आरती, बुधवार दि. १९ रोजी उत्सवाचा मुख्य दिवस, महाआरती, पालखी, सासनकाठी, गुरूवार दि. २० रोजी देव चाळोबा यात्रा, शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी देवी सातेरी, भावेश्वरी यात्रा, शनिवार दि. २२ रोजी मारूती, म्हारताळ, श्री देवी ईठलाई यात्रा, रविवार दि. २३ रोजी रवळनाथाच्या जुन्या हरक्या फेडणे यानंतर यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.त्यामुळं सर्व भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा,असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी सुरेश सातवणेकर यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments