चंदगड प्रतिनिधी : अंत्यसंस्कारानंतर रक्षा नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे. या पारंपरिक प्रथेला फाटा देत मांडेदुर्ग गावचे सुपुत्र श्री.डी जे पाटील सर यांनी आपल्या आई कै.सौ कमळाबाई जोतिबा पाटील वय वर्ष 80 राहणार मांडेदुर्ग यांच्या निधनानंतर रक्षा व अस्थी आपल्या घरासमोरील वृक्ष बागेत वृक्षांना घातली.
सध्या शहरात व ग्रामीण भागात देखील सर्वत्र सिमेंटचे जंगल तयार होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. अस्थींचे नदीत विसर्जन केल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते .त्याचबरोबर रक्षा पाण्यात विसर्जित केल्याने रक्षा पाण्यात तळाला जाऊन पाणी जमिनीत मुरण्यासाठी अडथळा निर्माण होतो. शिवाय पाण्यातील जलचर क्रोमी किटकानाही ते हानिकारक होते .या अनुषंगाने पारंपारिक रूढी परंपरेला फाटा देऊन चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावातील पाटील परिवाराने राबवलेला अभिनव उपक्रम समाजाला पथदर्शी ठरला असून आगामी काळात अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी व अनुकरणीय ठरेल .आपल्या माऊलीची आठवण कायम स्मरणात राहील हा उद्देश समाजासमोर ठेवून चांगल्या प्रकारचा आदर्श उभा केला आहे .
माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली.





Post a Comment
0 Comments