रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : महाराष्ट्र,कर्नाटक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री.क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड)येथील बाळूमामा यांचा भंडारा उत्सव 20 मार्च ते 28 मार्च या कालावधीत होत आहे. 20 मार्च रोजी देवालाय ट्रस्टचे धैर्यशीलराजे भोसले यांच्याहस्ते विणा पूजन होणार असून दररोज समाधी पूजन,काकड आरती,हरिपाठ प्रवचन,कीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम होतील.
या भंडारा उत्सवाच्या कालावधीत अशोक कौलवकर,रणजित भारमल, विनय कुलकर्णी, पुंडलिक गवळी, नानासो पाटील, रामचंद्र पाटील, मृत्युंजय स्वामी यांचे प्रवचन तर नानासो पाटील,अर्जुन जाधव, विष्णू खोराटे,मारुती देवडकर,बाळकृष्ण गिरी,भानुदास कोल्हापुरे,बाळकृष्ण परीट यांचे कीर्तन होणार आहे.दि.26 मार्च रोजी जागर,27 मार्च रोजी कृष्णांत डोणे ( वाघापूर ) यांची भाकणूक,काला कीर्तन,महाप्रसाद तर 28 मार्च रोजी पालखी व दैनंदिन कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती ट्रस्टच्या कार्याध्यक्ष रागिणी खडके यांनी दिली.
Post a Comment
0 Comments