पुणे/प्रतिनिधी : ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पुढील आठ दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिले. आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयाच्या विविध समस्यांचा पाढा अधिवेशनात मांडत ‘ससून’मधील रखडलेली भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.
ससून शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा होत असल्याची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर नुकतेच १२ कोटी ९४ लाख रुपयांची रुपयांची औषध खरेदी करण्यात आली आहे. तसेच उपकरणांची देखील खरेदी करण्यात आली. तर जिल्हा नियोजन समितीकडे आणखी औषध खरेदीची मागणी केली आहे, असे मिसाळ यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments