Type Here to Get Search Results !

कानडेवाडी येथे 63 घरकुल लाभार्थ्यांना मंजूरपत्रे वाटप

गडहिंग्लज/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना,ग्रामीण टप्पा 2 मधून कानडेवाडी ता.गडहिंग्लज येथील 63 लाभार्थीनां मंजूरपत्रे वाटप करण्यात आली.तालुक्यातील भाजपा युवा नेते संग्रामसिंह कुपेकर यांच्याहस्ते मंजूरीचे आदेश देण्यात आले.

यावेळी सरपंच अनिता कुंभार,शुभांगी देसाई,एन.डी.कांबळे,ग्रामसेवक वायदंडे,सुरेश कुंभार,मोहन बेनाडीकर,शुभांगी कांबळे,जयसिंग देसाई,अजित देसाई,बाळू सलामवाडे,संजय देसाई,अनाप्पा पाथरवट,बंडोपंत कुंभार,दिपक देसाई,दिनकर डवरी,अमित सूर्यवंशी,अशोक शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments