चंदगड/प्रतिनिधी : हलकर्णी (ता.गडहिंग्लज)येथील खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यात यावे या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी आपल्या जनावरसह ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.
हे खडी क्रशर दिवस-रात्र सुरु असून यातून निघणाऱ्या धुळीचा मानवी आरोग्यावर व शेतपिकांवर परिणाम होत आहे.तसेच धुळीने चारा खराब होत असल्याने चाऱ्याच्या प्रश्न निर्माण असून हा चारा खाल्याने जनावरे आजारी पडत आहेत.सतत भुसुरुंगामुळे विहिरी व बोरवेल कोरड्या पडत आहेत.26 जानेवारी रोजी झालेल्या ठरावानुसार ग्रामपंचायतिने पुढील पाठपुरावा करावा असे निवेदनात म्हटले आहे.पण अजूनही यावर ठोस कारवाई न झाल्याने नागरिक आता रस्त्यांवर उतरत निषेध करत आहेत.या आंदोलनात राजगोंडा पाटील,उत्तम खानापुरे,संजय धनगर,अप्पासाहेब पोवार,शामराव धनगर,शेखर देसाई,रामू शेरवी,महेश मुंगुरवाडे,रामगोंडा रामाजगोळ,उमेश धनगर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments