Type Here to Get Search Results !

चंदगड येथे ज्येष्ठ नागरिक समितीची बैठक पार

चंदगड प्रतिनिधी : चंदगड तालूका ज्येष्ठ नागरिक जिव्हाळा सेवा समितीची बैठक हणमंत नाईक सहाय्यक पोलिस निरीक्षक यांचे दालनांत संपन्न झाली.गृहखात्याशी संबधीत ज्येष्ठांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन त्यांना सादर करणेत आले.

समाजातील ज्येष्ठांच्या उतारवयातील प्रश्नांकडे लक्ष वेधून मदत करणेचे आश्वासन नाईक यानी शिष्टमंडळास दिले.शासन निर्णयनुसार ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली.त्यामुळे गृहखात्याशी निगडित लागणारे सहाय्य करणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.याप्रसंगी वयोवृद्ध ज्येष्ठ कार्यकर्त पुंडलीक पाटील,संपर्क प्रमुख सोमनाथ गवस,दिगंबर गायकवाड,सुभाष मातोंडकर, रामचंद्र पवार, शरद पाटील, तुकाराम पाटील,राजाराम सुतार,बाबूराव पाटील इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments