(चंदगड एस.टी. आगाराला लवकरच देणार पत्र,सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती)
चंदगड/प्रतिनिधी : तिलारी घाटातून एसटी बससेवा सुरू करण्यासंदर्भात येत्या आठवड्याभरात राज्य परिवहन महामंडळाला सार्वजनिक बांधकाम विभाग पत्र देणार असल्याची माहिती उपअभियंता ई. ए. मुल्ला यांनी सोमवारी दिली.सात-आठ महिन्यांपासून अवजड वाहनांसाठी तिलारी घाट बंद करण्यात आला होता. घाटातील एका अवघड वळणाजवळ दरीच्या दिशेने रस्ता खचला होता. या खचलेल्या भागापैकी निम्म्या भागाचे कॉंक्रिटीकरण झाले आहे. उर्वरीत भागाचे काँक्रिटीकरण मंगळवारी होणार आहे त्यामुळे येत्या आठवड्याभरात हा रस्ता वाहतुकीसाठी सज्ज होईल.
सध्या चारचाकी छोट्या वाहनांची या घाटातून ये-जा सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या तिलारी घाटातून जाणाऱ्या पणजी, दोडामार्ग एसटी बसेस घाट दुरुस्तीमुळे बंद आहेत. येत्या आठवड्याभरात रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. सार्वजनिक बांधकाम विभाग याच आठवड्यात तिलारी घाटातून एसटी बससेवा सुरू करण्यासंबंधीचे पत्र चंदगड आगाराला देणार असल्याचे मुल्ला यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment
0 Comments