चंदगड/प्रतिनिधी: वैजनाथ शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिक्षक संघ दोन्ही गटामध्ये तडजोड करावी यासाठी अनेक ज्येष्ठांनी प्रयत्न केले, पण सत्ताधाऱ्यांनी हे प्रयत्न धुडकावून लावले ,अखेर निवडणूक लागली आणि काल रविवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये 15 जागा पैकी 14 जागावर यश मिळवून शिक्षक संघ थोरात गट प्रणित श्री राजश्री शाहू परिवर्तन स्वाभिमानी आघाडीने भरघोस संपादन केले.
निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे -मनोहर नाईक, अविनाश दावणे, सागर खाडे,सचिन तेरणीकर विठ्ठल पाटील,उदय पाटील,परसराम नाईक , दयानंद पवार हे सर्वसाधारण गटातून असून, महिला गटामधून उज्वला चिंचनगी व आसावरी बल्लाळ,तर इतर मागास प्रवर्ग मधून पुंडलिक कुंभार आणि अनुसूचित जाती गटामधून -तुकाराम कांबळे व विमुक्त प्रवर्गातून एम एम नाईक हे उमेदवार भरघोस मताने निवडून आले.
विजयी पॅनलचे प्रमुख म्हणून उठावदार भूमिका पार पडणारे थोरात गटाचे अध्यक्ष सदानंद पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष शाहू पाटील त्याचबरोबर नेते नामदेव कोले व डी एम पाटील यांच्यासह,महिला आघाडी अध्यक्ष स्वाती जोशी, कार्याध्यक्ष स्मिता शेटकर,कोषाध्यक्ष सरला गायकवाड यांच्यासह पारगड पतसंस्था चेअरमन मंगल नौकुडकर ,संध्या सोनार, व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जिल्हाभर कौतुक होत आहे.सत्तारूढ गटाचे नेतृत्व, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शिवाजी पाटील व सहकारी यांनी केले.
शिक्षक बँक निवडणुकीमध्ये, जिव्हारी लागलेला पराभव या अभूतपूर्व यशामुळे धुवून निघाला.अशा भावना अध्यक्ष सदानंद पाटील यांनी व्यक्त केल्या.तर आमच्या पॅनेलचा विजय म्हणजे मतदार राजांनी आमच्या संघटनेच्या कामाबद्दल दिलेली पोचपावती असंच म्हणावं लागेल ,अशा भावना शाहू पाटील यांनी व्यक्त केल्या.या संपादन केलेल्या अभूतपूर्व यशामुळे संस्था परिसर आणि कार्यकर्ते अगदी गुळालात नाहून गेले होते.जिल्हास्तरावरूनच नव्हे तर राज्यस्तरावरून शिक्षक संघ थोरात गटाचे कौतुक करण्यात येत आहे.





Post a Comment
0 Comments