चंदगड/प्रतिनिधी : हिंडगाव येथे बोअर खोदून पी.एम. कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॉवर जोडून देण्यास टाळाटाळ करत असल्याने तुतीचे पीक वाळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सोमवार १७ मार्च पर्यंत जोडणी न दिल्यास चंदगड तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा स्वावलंबी बहुउद्देशीय संस्थेमार्फत अंजनी फाटक, आसिस कुतीनो यांनी तहसीलदारांना दिला आहे.
अंजनी फाटक व स्वावलंबी दिव्यांग संस्था अध्यक्षानी मिळून पी. एम. कुसुम अंतर्गत दीड वर्षापूर्वी २२,९७१ रूपये भरून ३ एचपीची मागणी केली आहे. महावितरण कडून सर्व तपासण्या झालेल्या आहेत. मात्र कनेक्शन जोडण्यासाठी दिवसावर दिवस ढकलले जात आहेत. पाण्याची व्यवस्था वेळेत होणार, या आशेवर मनेगा मार्फत एक एकर तुती रोपांची लागवड केली. सोलरचे काम वेळेत न झाल्याने ते पूर्ण वाळून गेले आहे. बकरी पालन योजने अंतर्गत १ कोटी रूपयांचा प्रोजेक्ट गमवावा लागला आहे. एप्रिल, मे महिन्यात भाज्यांना पुष्कळ दर मिळतो. यासाठी सेंद्रीय शेतीपासून भाजीपाला उत्पादन घेऊन दिव्यांग, विधवा बंधू-भगिनीनी रोजगार मिळवून देण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे अपयश आले.सोमवार १७ मार्च पूर्वी सोलरचे काम करून सहकार्य करावे, अन्यथा लाखो रूपयांची नुकसान भरपाई देण्यासाठी स्वावलंबी दिव्यांग संस्थेमार्फत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा लक्ष्मण पाटील,प्रभावती देशपांडे, सरस्वती सुतार, विष्णु सुतार, निवृत्ती लोहार, मनिषा चौगुले, वासंती जुवेकर, रूक्मीणी चौगुले, जानकी चौगुले, रेखा फाटक, शिवाजी यादव यांनी दिला आहे.
Post a Comment
0 Comments