चंदगड/प्रतिनिधी : 54 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्य अथर्व-दौलत येथे विविध उपक्रमानी सुरक्षा सप्ताह दिन साजरा करण्यात आला. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार कल्याण अधिकारी अश्रु लाड व सेफटी ऑफीसर नामदेव चौगुले यांनी सर्वाना सुरक्षतेची शपथ दिली.
यावेळी मार्गदर्शन करतांना विजय मराठे व सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, सर्व कामगार यांनी कारखान्यात काम करत असतांना अपघात होवु नये यासाठी सेफटी उपकरणे यासह सर्व सेफटी साधनाचा वापर करावा.व सुरक्षेतेच्या दृष्टीकोनातून कामावरुन घरी जात असतांना कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा वापर करावा व सुरक्षेतेच्या सर्व नियमाचे पालन करुन विना अपघात काम केल्यास कामगारांची कारखान्याची तसेच राष्ट्राची प्रगती होते.तसेच कामगारांनी दिलेल्या नियमावलीप्रमाणे व सुरक्षा साहित्यांचा वापर केल्यास अपघात रोखण्यास मदत होते,असे मुख्य कार्यकारी अधिकारी मराठे यांनी सांगितले.
सुरक्षा सप्ताहनिमित्य कामगारांचे सेफटी निबंध कविता, स्लोगन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी कारखान्याचे संचालक विजय पाटील, चिफ इंजिनिअर सिध्देश्वर शिंदे, फायनान्स मॅनेजर सुनिल चव्हाण, जनसंपर्क अधिकारी दयानंद देवाण व सर्व खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments