Type Here to Get Search Results !

शिवाजी विद्यापीठाच्या आवारात थोर समाजसुधारक महापुरुषांचे पुतळे बसवा-ब्लॅक पँथर पक्ष

कोल्हापूर/प्रतिनिधी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,महात्मा फुले व राजाराम मोहन रॉय यांचे पुतळे शिवाजी विद्यापीठ परिसरात उभे करा,अन्यथा येत्या 8  मार्च जागतिक महिला दिनानंतर लाडक्या बहिणी मार्फत पुतळ्यासाठी भीक मागुन निधी देऊ असे निवेदन ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने निवासी  उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,भारतात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली.यामुळेच आज महिलांना अनेक पदावर संधी मिळत आहे.एकेकाळी रूढी परंपरेनुसार भारतात सती प्रथा चालू होती.महिलाना दुय्यम स्थान दिले जात होते.स्त्रियांनी जिवंतपणे नवऱ्याच्या मृत्यूच्या चितेमध्ये उडी घेऊन आपले जीवन संपवावे लागत होते.मात्र राजाराम मोहन रॉय यांनी चार डिसेंबर 1829 रोजी लॉर्ड विलियम बेटीक यांच्यामार्फत कायदा करून अन्यायी सतीची चाल बंद केली.यामुळे सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतिबा फुले,राजाराम मोहन रॉय यांचे पुतळे शिवाजी विद्यापीठात उभारण्याची मागणी होत आहे परंतु विद्यापीठ प्रशासनाने यासाठी निधी नसल्याचे म्हटले आहे.जिल्हा प्रशासनाने शिवाजी विद्यापीठ प्रशासनाला तात्काळ पुतळे बसवण्याचे आदेश देण्यात यावेत.अन्यथा 8 मार्च हा जागतिक महिला दिन विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करत कोल्हापुरातील लाडक्या बहिणीकडून त्यानंतर भिक मागून निधी संकलित करून तो शिवाजी विद्यापीठाच्या खात्यावर जमा करू असा इशारा दिला. 

यावेळी ब्लॅक पॅंथर संस्थापक सुभाष देसाई,शिवाजी परुळेकर,मधुकर पाटील,प्रियांका माने,सुभाष कापसे,आनंद सातपुते,समीर कोतवाल, कल्पना कांबळे, शुभांगी बिराजदार शुभांगी, तय्यब अली,मधुकर पाटील आधीसह सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments