चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात जागतिक महिला दिनाच्या सप्ताहाचे औचित्य साधत नवदुर्गा सन्मान 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये चंदगड तालुक्यातील सुंडी गावची कन्या अनुष्का राजीव पाटील हिला नवदुर्गा भूषण हा सन्मान प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून ऍडव्होकेट मनीषाताई रोटे,ज्येष्ठ विचारवंत सुजाता पेंडसे,सुमिता सातारकर,संज्योती जगदाळे,विभा चोरगे,प्रियांका गोरे,मनीषा लोहार,मनीषा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
अनुष्का ही शालेय व शालेय बाह्य स्पर्धेत भाग घेऊन कायमच उज्वल यश प्राप्त करत आहे.त्याचबरोबर दरवर्षी आपला वाढदिवस देखील वृद्धाश्रम मध्ये साजरा करत असून तिच्या या वागण्याने व आपुलकीने एक नवा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे.अश्या भेटीतून वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना लागलेला अनुष्काचा लळा एका वीडियोतून चांगलाच व्हायरल होत आहे.त्याचबरोबर अनुष्का ही काही दिवसापूर्वी बेळगाव येथील आयोजित कार्यक्रमात मिस बेळगावची मानकरी ठरली आहे.
अगदी कमी वयात तिने मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे.या यशामध्ये आजोबा झिम्माना पाटील, वडील राजीव पाटील,आई प्रिया पाटील,आजी सुलोचना पाटील,काका प्रताप पाटील व निंगाप्पा पाटील,काकी डॉक्टर कल्पना पाटील त्याचबरोबर मराठी विद्यानिकेतन बेळगावचे प्राचार्य हुडकेकर,प्रसाद सावंत,जी.वी.सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे तिने प्रतिनिधीला सांगितले.
Post a Comment
0 Comments