चंदगड प्रतिनिधी : शारदा शिक्षण संस्थेचे बागिलगे-डुक्करवाडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे ज्येष्ठ अध्यापक महादेव शिवनगेकर यांना गुरुवर्य डी.डी.आसगांवकर शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्ट मार्फत शैक्षणिक,सामाजिक तसेच विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्धल व उपक्रमशीलतेबद्धल सन २०२४-२५ सालाचा 'गुरुवर्य डी.डी.आसगांवकर गौरव पुरस्कार'देऊन सन्मानित करण्यात आले .
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील होते.शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी के शिर्के यांच्याहस्ते शिवणगेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.डी.आसगावकर ट्रस्टचे अध्यक्ष,शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले. यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या जिल्हयातील शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला शितल शिवणगेकर,तुळसाबाई शिवणगेकर,संजय साबळे, रवींद्र पाटील, , मोहन पाटील, एस.पी. पाटील, अनंत पाटील, व्ही.एल. सुतार, एच.आर. पावसकर, ऋषिकेश शिवणगेकर, नामदेव शिवणगेकर विनायक शिवणगेकर व कोजिम परिवारातील सर्व पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गोंधळी यांनी केले केले.
Post a Comment
0 Comments