(चालू वर्षी उत्पादनात 70 टक्के घट)
चंदगड/प्रतिनिधी : शासनाने काजू उत्पादक शेतकऱ्यांना किमान १७५ रूपये प्रति किलो हमीभाव द्यावा, अशी मागणी चंदगडचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांच्याकडे शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावर्षी काजू पीक उत्पादन हवामानातील बदलामुळे अत्यल्प आहे. काजूवरील मोहर धुक्यामुळे अधिक प्रमाणात काळपट पडून गळून गेला आहे. त्यामुळे यापुढे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत 70 टक्के काजू उत्पादनात घट असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे. याचा गंभीरपणे विचार करून राज्य सरकारने गोवा राज्याप्रमाणे यावर्षी काजूला प्रति किलो १७५ रूपये किमान दर घोषित करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
जंगमहट्टी सोसायटीचे चेअरमन संभाजीराव पाटील, कार्यकर्ते विजयभाई पाटील, धोंडोपंत पाटील, रविंद्रकुमार पाटील, अश्विनकुमार पाटील, आण्णाप्पा पाटील यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे रविवारी मागणीचे निवेदन दिले आहे.दरवर्षी काजू उत्पादन अधिक होत होते आणि दर अत्यल्प मिळत होता मात्र यावर्षीची परिस्थिती खूप वेगळी असून काजू उत्पादनात 70 टक्के घट झाली असून काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना काजू बागाची निगरानी राखण्याचे सुद्धा पैसे मिळत नसल्याचे खंत व्यक्त होत आहे. आम्ही शासनाने शेतकऱ्यांना हा हमीभाव द्यावा अशी जोरदार मागणी धरत आहे.
Post a Comment
0 Comments