चंदगड/प्रतिनिधी : १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनांनिमित्त चंदगड येथे सहयाद्री प्रतिष्ठान व आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन मार्फत सामाजीक कार्यांत सहभागी असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
यावर्षी संघटनेचे चौथं वर्ष असून सामाजीक बांधलकी जपून असा कार्यक्रम प्रतिवर्षी साजरा केला जातो.कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रा.डॉ एसडी गोरल भूषविणार असून प्रमुख मार्गदर्शक प्रा एन एस पाटीस आहेत. तर या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक विश्वासराव पाटील व परिक्षेत्र वनअधिकारी नंदकुमार भोसले हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment
0 Comments