Type Here to Get Search Results !

आमदार शिवाजीराव पाटील यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती.

चंदगड प्रतिनिधी : चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आज चंदगड तालुक्यातील सर्व प्रशासकीय  कार्यालयांना भेटी देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. चंदगड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आमदार शिवाजीराव पाटील यांना समजल्या त्यांनी तात्काळ सर्व प्रशासकीय कार्यालयांना भेटी देण्याचा निर्णय घेतला. 


आज पोलीस स्टेशन चंदगड या ठिकाणी भेट देऊन पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारी वेळेत संपवण्यात याव्यात व जनतेला न्याय मिळावा यासाठी पोलीस यंत्रणा तत्पर असली पाहिजेत आणि इथून पुढच्या काळात पोलीस स्टेशन बाबत कोणती तक्रार माझ्यापर्यंत येऊ नये याची काळजी घ्यावी असे ठणकावून सांगितले .त्यानंतर चंदगड तहसीलदार कार्यालयास त्यांनी भेट दिली चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना जनतेच्या कामाबाबत अनेक प्रश्न विचारून कामांमध्ये होणारी दिरंगाई आणि नागरिकांची काम ताबडतोब करण्याबाबत सूचना करण्यात आलीभूमिलेख  कार्यालयातील अधीक्षक महेश कुंभार यांना शेतकरी मोजणीसाठी पैसे भरतात परंतु पैसे भरून देखील वेळेत मोजणी होत नसल्याबाबत तक्रारी आहेत. मोजणीच्या शासकीय रकमेव्यतिरिक्त जादाची रक्कम घेऊन तात्काळ मोजणी होत असल्याबाबतच्या अनेक नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत.अशा पद्धतीच्या तक्रारी माझ्यापर्यंत येऊ नयेत असं तुमच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम केले पाहिजेत अन्यथा मला वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडू नका असे ठणकावून सांगितले व इथून पुढे कोणतेही काम गांभीर्याने करण्याबाबत सूचना करण्यात आली.

आजच्या या भेटीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आमदारांच्या विषयी एक वेगळी धास्ती निर्माण झालेली आहे.या धास्तीमुळे निश्चितपणे चंदगड विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना अधिकाऱ्यांच्या कडून नक्कीच न्याय मिळेल अशी भावना नागरिकांच्या मध्ये बोलली जात आहे.यावेळी माजी सभापती शांताराम पाटील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे संयोजक नामदेव पाटील ,अनिल शिवनगेकर ,रवींद्र बांदिवडेकर भाजप तालुका अध्यक्ष दिग्विजय देसाई, विशाल बल्लाळ, विद्या पाटील ,अशोक गडदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments