चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्याचे माजी आमदार राजेश पाटील यांनी तालुक्यात विविध ठिकाणी विकास कामे मार्गी लावली असून काही ठिकाणी प्रलंबित विकास कामे पाहणी करत ती कामे मार्गी लावत आहेत. तर नव्याने मंजूर झालेल्या कामांचा शुभारंभही पार पडत आहे.
नांदवडे (ता. चंदगड) येथे ३ कोटी ४३ लाखांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन राजेश पाटील यांच्याहस्ते पार पडले.यावेळी ते म्हणाले की,'जनतेचे नेतृत्व करीत असताना जी-जी आश्वासने दिली,त्याची पूर्तता करण्याचे भाग्य मला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या कामांसाठी निधी लावता आला,ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे," असे मत त्यांनी मांडले.अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र कांबळे होते.
ताम्रपर्णी नदीवर माऊलीचा गोंड येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, श्री माऊली मंदिरासमोरील सभागृह बांधकाम, कृष्णा सुतार यांच्या घरापासून ते हायस्कूलपर्यतच्या रस्त्याचे डांबरीकरण, शेवाळे येथील दलित वस्ती स्मशानभूमी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, मुख्य रस्ता ते दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, श्री माऊली मंदिर ते चव्हाट्यापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, शेवाळे मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी विठोबा गावडे,भरमाणा गावडे, ॲड. संतोष मळवीकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर या प्रसंगी महादेव प्रसादे, परशराम पाटील, शशिकांत पाटील, भगवान वणकुद्रे, एन. एस. पाटील, विठ्ठल पावले, मोहन झेंडे, नेताजी सुभेदार, विलास पाटील उपस्थित होते. उपसरपंच एन. एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्ही. जी. गावडे यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments