चंदगड/प्रतिनिधी : स्व. डॉ. डी. व्ही. तोगले सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धाचे तिसरे पर्व यावर्षी रविवार दि.11 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता सुरु होत आहे.स्पर्धा चंदगड तालुका मर्यादित स्पर्धकांसाठी असून या स्पर्धा बालवीर गट (इयत्ता 7वी पर्यंत) कुमार गट (10 वी पर्यंत)युवा गट (23 वर्षे पर्यंत) आश्या तीन गटात होत आहेत प्रत्येक गटातील प्रथम आठ विजेत्यांना रोख बक्षीस व प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना मेडल देऊन गौरवण्यात येणार आहे.तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना उन्हाळी व्हाईट कॅप देण्यात येणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी 5 मे 2025 पर्यंत आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन ताम्रगड चे अध्यक्ष श्री. एन. आर. पाटील यांनी केले आहे.नाव नोंदणी साठी रामू मास्तर अभ्यासिका, तोगले सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोवाड येथे संपर्क साधावा.
संपर्क-
अशोक वर्पे-7776998310.
सुभाष बेळगावकर-9922088852.
संजय कुट्रे-9420459379.
Post a Comment
0 Comments