चंदगड प्रतिनिधी /रुपेश मऱ्यापगोळ : चंदगड विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार राजेश दादा पाटील प्रेमी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गट ) यांच्यावतीने उद्या शुक्रवार दिनांक 2 मे रोजी अडकूर येथील सरकारी दवाखान्या जवळील महालक्ष्मी मैदानात सकाळी ठीक ९ वाजता भव्य नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या शेतकरी मेळाव्यामध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्यामध्ये माजी आमदार नरसिंगराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार राजेशदादा पाटील यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments