Type Here to Get Search Results !

उद्यापासून जांबरे येथे देव रवळनाथ मंदिराचा वास्तुशांती सोहळा.

चंदगड (प्रतिनिधी) : जांबरे येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिराचा वास्तुशांती व जीर्णोध्दार सोहळा शुक्रवार २ ते ५ मे अखेर पुरोहित ब्राम्हणांच्या वेदमंत्राच्या घोषामध्ये होणार आहे. समस्त भाविक, दानशूर व्यक्ती व जांबरे ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून साकारलेल्या श्री देव रवळनाथ मंदिराची वास्तुशांती व जीर्णोधार सोहळा विविध धार्मिक विधीने साजरा करण्यात येणार आहे.


शुक्रवारी सकाळी ९ वाजता प्रायश्चित विधी, मुहूर्त मेढ़, देवांना आमंत्रण, कलश मिरवणूक व पुजन सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, रात्री ९ वाजता स्वरधारा भजन, रात्री ११ वा. उमगाव, कोकरे, न्हावेली, नागवे, अहुरे येथील भजन.शनिवारी सकाळी ९ वा. गणेश पुजन, पुण्याहवाचन, आचार्यवरण, संप्रोक्षण, देवता पुजन, होम यज्ञ, प्रसादवास्तु, बलीदान, पूर्णाहुती, सायंकाळी ६ वा. महिला हरिपाठ, रात्री ९ वाजता कीर्तन, रात्री ११ वाजता भारुड, रात्री १ वाजता पिळणी, सहेगुडवळे, चौकुळ, इसापूर, चंदगड, वाघोत्रे येथील भजन तर रविवारी सकाळी ९ वाजता सत्यनारायण पुजा, महाआरती, गान्डाणे, दुपारी १ ते सायंकाळी ४ महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता साई भजन मंडळ चराटें-सावंतवाडी, रात्री ९ वाजता नक्षत्रांचे देणे गायन, रात्री ९९ वाजता दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ व सामाजिक कार्यकर्ते,उद्योजक लक्ष्मण गावडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments