(स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची धडक कारवाई)
कोल्हापूर प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस पथक तयार करून रेकॉर्ड वरील गुन्हेगार बाबत माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार समीर कांबळे यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, मुरगुड पोलीस ठाणे हद्दीतील माद्याळ या गावाचे कोंडार याठिकाणी असलेल्या उसाचे शेतामध्ये एका इसमाने गांजाची काही झाडे लावल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.
त्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदारांचे पथक यांचेसह सदर ठिकाणी जाऊन छापा मारला.दिनकर राणे यांच्या मालकीच्या उसाचे शेताचे मधोमध काही गांजाची झाडे मिळून आल्याने सदरबाबत दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून शेती एकुण 21 किलो 957 ग्रॅम वजनाचा ओला गांजा व इतर साहित्य असा एकूण 2,20,570/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.तर दिनकर कृष्णा राणे,वय 75 धंदा शेती रा. माद्याळ ता. कागल, जिल्हा कोल्हापूर या शेतमालकास ताब्यात घेवुन एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास मुरगुड पोलीस ठाणे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील,अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सपोनि चेतन मसुटगे, पोसई जालिंदर जाधव, तसेच पोलीस अंमलदार अशोक पोवार, समीर कांबळे, राजु कांबळे, अरविंद पाटील, विजय इंगळे, रोहीत मर्दाने, अनिकेत मोरे, युवराज पाटील, प्रशांत कांबळे, सतिश जंगम, हंबीर अतिग्रे, खंडु कोळी, प्रकाश पाटील, वसंत पिंगळे, कृष्णात पिंगळे, संजय हुंबे, विशाल खराडे, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, नवनाथ कदम, सोमराज पाटील, निवृत्ती माळी यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments