गुहागर /प्रतिनिधी : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य ज्योतीराव फुले यांची संयुक्त जयंती गुहागर आगाराच्या इतिहासात प्रथमच मोठ्या जल्लोशी वातावरणात पार पडली.दरम्यान आगार व्यवस्थिपक अशोक चव्हाण,प्रमुख पाहुणे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांचेहस्ते दोन्ही महामानवानचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.यानंतर सर्व अधिकारी व इतर प्रमुख पाहुणे यांचेहस्ते दीपप्रजवलीत करण्यात आले.नंतर बौद्ध उपासक अनंत जाधव( वरवेली ) विशाल सावंत ( पाटपन्हाळे ) यांचे वतीने बुद्ध वंदना व भीमस्थूती घेण्यात आली.व पूजन झाल्यावर प्रमुख मान्यवर यांचे उपस्थितीती मध्ये गुलामगिरी या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.यावेळी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाला आगार प्रमुख अशोक चव्हाण,पत्रकार पराग कांबळे,स्वप्नील शिंदे (स्थानकप्रमुख ), वाहतूक नियंत्रक सुनील पवार,मनीष साखरकर,रामा पुंड,रवींद्र घाग,सुषमा डोंगे यांचेसह रापचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थितीत होते.संपूर्ण कार्यक्रमचे सूत्रसंचालन रामा पुंड यांनी केले.तर आभार सूर्यकांत भोसले यांनी मानले.

Post a Comment
0 Comments