Type Here to Get Search Results !

हा फोटो म्हणजे खऱ्या अर्थाने समाज एकता- ऍड.संकेत साळवी

 

गुहागर/ प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांनी शृंगारतळी गुहागर येथे आयोजित केलेल्या ‘समाज एकता चषक’ क्रिकेट स्पर्धेत कार्यक्रम एकूण १२ समाजाच्या संघानी सहभाग नोंदवला होता.चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो क्षत्रिय मराठा समाजाच्या ‘स्वराज्य रक्षक’ व मुस्लिम समाजाच्या ‘आझाद फायटर्स’ या दोन संघाच्या दरम्यान झालेला सामना.हा सामना पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळली होती.चुरशीच्या या सामन्यांमध्ये मराठा समाज विजयी झाल्यानंतर जे घडल ते सामाजिक ऐक्याचा नवीन पायंडा पाडणार ठरल.


सामन्यानंतर या दोन्ही संघाच्या खेळाडूनी एकत्र येवून गळाभेट घेऊन फोटो काढले.. सामन्यादरम्यान असलेले टेन्शन विसरून दोन्ही संघानी एकत्र ठेवून जल्लोष केला हा खेळ भावनेचा विजय ठरला.हा फोटो म्हणजेच खऱ्या अर्थाने ‘समाज एकता चषक’ आहे,असल्याचे मत क्षत्रिय मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष एड. संकेत साळवी यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments