चंदगड प्रतिनिधी : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याच्या वतीने मौजे राजगोळी येथील ओलम शुगर या करखान्यामद्ये इथेनॉल प्रोजेक्ट होत असून ह्या प्रोजेक्ट साठी जी नवीन नोकर भरती होणार आहे त्यासाठी स्थानिक लोकांना प्राधान्य देण्याची मागणी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली.तसेच कित्येक वर्षे काम करून काही लोकांना अजून पर्मनंट ऑर्डर दिल्या नाहीत त्यांना लागलीच ऑर्डर देण्यात याव्यात अन्यथा कामगार आयुक्त यांच्या कडे तक्रार करण्यात येईल अशी सूचना कारखाना प्रशासनाला देण्यात आली त्याचबरोबर कारखाना स्थळावर एखादा रोजगार मेळावा बोलवून कुशल अकुशल नोकर भरती करावी असे ही सांगण्यात आले.
यापूर्वी ओलम शुगर मिल मद्ये जी भरती झालेली आहे तिथे स्थानिक लोकांचा विचार न करता बाहेरील नोकर भरती करण्यात आल्याचे दिसून येत आहे, भविष्यात जर असच चाललं तर येणाऱ्या गळीत हंगामा वर याचा परिणाम होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. चंदगड विधानसभा प्रमुख राजू रेडेकर यांनी हा प्रश्न आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर मांडल्यानंतर याबाबत एक मत झाले.त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे,उप जिल्हा प्रमुख संभाजी पाटील,चंदगड विधान सभा प्रमुख राजू रेडेकर,विष्णू गावडे,गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीपराव माने,आजरा तालुका प्रमुख युवराज पवार,युवा सेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील,युवा सेना तालुका प्रमुख किरण नागुर्डेकर, विभाग प्रमुख दिगंबर पाटील,दिंडलकोप माजी सरपंच पाच्यासाहेब काझी,नावला मानवडकर,दशरथ सुतार,दूंडगे शाखा प्रमुख तुकाराम पाटील,महेश यादव,कागणी शाखा प्रमुख रवी आपटेकर, तुर्कवाडी युवा सेना शाखा प्रमुख भरमु बिर्जे अश्या लोकांनी एकत्र येत हा विषय ओलम प्रशासनासमोर मांडला.
Post a Comment
0 Comments