चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : संत बसवेश्वर यांनी अनुभव मंडपातून जगाला जो समतेचा संदेश व गौतम बुध्दाचा विचार पुढे नेला,तोच विचार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवीला असे मत संघर्ष मुक्तीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी मांडले.भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पाटणे फाटा येथे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग.रा. कांबळे होते.
यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.सुंडी येथील सिद्धार्थ बहुउद्देशीय सेवा संस्था महिला मंडळ यांनी भीम गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस. व्ही. ऐनिकर,संग्राम सावंत,संरक्षण दलाचे जिल्हा उपाध्यक्ष मेजर तुकाराम कांबळे, समता सैनिक दलाचे जवान, मीनाक्षी कांबळे, काशिनाथ कांबळे, मारुती कामत यांच्यासह विविध भागातून आलेले भीमसैनिक, व महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ कांबळे व प्रास्ताविक पि. के.कालकुंद्रीकर यांनी केले.तर आभार संगीता कांबळे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments