Type Here to Get Search Results !

चंदगड येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात.

चंदगड/प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.चंदगड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कमानी जवळ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व तेथून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी चंदगड अर्बन बॅंकेचे सर्वेसर्वा दयानंद काणेकर होते.यावेळी चंदगडच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर म्हणाल्या,'बाबासाहेबाच्या घटनेमुळे स्त्रियाना शिक्षणाचा अधिकार मिळाला. आणि घटनेमुळेच आपल्या वार्डला पाच वर्षांत 4 कोटींचा निधी मिळाला हे फक्त घटनेमुळे झाले'


यावेळी सुनिल काणेकर म्हणाले, '60 राज्याच्या घटनेमध्ये आपली घटना सर्वात कडक आहे.इतर देश आपल्या घटनेचा आधार घेतात, त्यामुळे आपली घटनाचं महान असल्याचा आम्हाला अभिमान आहे'


यावेळी इतर मान्यवरांचीही भाषणे झाली.मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थितीत पाहूण्याचे स्वागत करण्यात आले. व महिलांकडून नेत्रदिपा प्रमोद कांबळे (नगरसेविका) यांचा सर्वात जास्त निधी व वार्डात भरघोस विकासकामे केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि.प.सदस्य बाबुराव परिट, महादेव वांद्रे, अर्बन बॅंकेचे संचालक प्रमोद कांबळे, संतोष हळदणकर,श्रीकांत कांबळे, हनिफ सय्यद, सुबान मुल्ला यांच्याहस्ते कमानी जवळील फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाला चंदगड अर्बन बॅंकेचे चेअरमन दयानंद काणेकर,माजी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला,संचालक सुनील काणेकर, संजय चदगडकर,नौशाद मुल्ला, एच.के.मकानदार, श्रीकांत कांबळे, प्रा. एक.डी.काबळे,प्रा.दूष्यत शिंदे, ए.वाय.जाधव आदीसह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत कांबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments