चंदगड/प्रतिनिधी : मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी या शाळेमध्ये एस.एस.सी 1975 बॅचच्या जुन्या सवंगड्याचा सुवर्ण महोत्सव स्नेहमेळावा रविवार दि.13 एप्रिल 25 रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅचमधील हुशार विद्यार्थी वैजनाथ हुद्दार (बी. ई. मेकॅनिकल) सध्या रा. पुणे हे होते. तर प्रमुख सत्कारमूर्ती गुरुजी एम. एन. कुट्रे रा. किणी,पी. एम. डागेकर रा. शेनोळी,श्री. व्ही. आर. गावडे रा. तुर्केवाडी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून लिला पाटील (माजी प्राचार्य व विद्यमान चेअरमन जिजामाता महिला बँक बेळगाव),शांता बाबुराव टक्केकर (संचालक, शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी),प्रा. दीपक पाटील (उपसरपंच ढोलगरवाडी)या मान्यवरांच्या हस्ते दीप-प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. रमेश भोसले यांनी केले.
पन्नास वर्षानंतर गुरु शिष्याची भेट ही आमची जुन्या आठवणींना उजाळा देत असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले.दिवंगत आद्यसर्पमित्र, संस्थापक,मुख्याध्यापक कै. बाबुराव टक्केकर व कै. एन. एन. पाटील यांच्या कार्याला व स्मृतीला अभिवादन करून दिवंगत गुरुजन व वर्गमित्र यांनी आदरांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाचे स्वागत के. आर. पाटील यांनी केले.तर सुरेश कोंबेकर ,सुरेश देसाई,राजाराम पाटील,धनाजी टक्केकर,बाबाजी पाटील,बुधाजी पाटील,विठोबा ओऊळकर या आदी विद्यार्थ्यांनी मनोगतातून पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणी व अनुभव कथन केले. सर्वांनी आपली ओळख करून दिली. यापूर्वी मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरडीमध्ये सन 1990 ते 1991 या बॅचने 25 वर्षानंतर माजी विद्यार्थी सोहळा घेतला होता.
त्यानंतर पहिल्यांदाच पन्नास वर्षानंतरचा स्नेह मेळावा हा गुरु-शिष्य संस्कृतीची जपवणूक करणारा मेळावा असून आपले गाव सोडून आज पुणे, गोवा बेळगाव, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शेतकरी मित्रासोबत संपन्न केलेला हा मेळावा ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आहे.50 वर्षानंतरचा बदलणारा समाज व वास्तव यावर एम. एन. कुट्रे यांनी मार्गदर्शन केले.67ते 68 वर्षाच्या विद्यार्थ्यांना आम्ही ओळखू शकत नाही पण आज स्नेह मेळाव्याच्या निमित्त एकत्र आल्याचा आनंद व्यक्त करत शिक्षण पद्धतीचा बदल व आजची परिस्थिती यावर व्ही.आर. गावडे यांनी प्रकाश टाकला.लिला पाटील यांनी कै. बाबुराव टक्केकर सरांनी 50 वर्षांपूर्वी राबवलेल्या अनेक शैक्षणिक सामाजिक, अंधश्रद्धा निर्मूलन, अशा उपक्रमाची आठवण करून दिली.'नैसर्गिक व आनंदही शिक्षणाची 50 वर्षांपूर्वी सरांनी राबवलेले संकल्पना आज आनंदी शिक्षण म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याचे स्पष्ट केले.' प्रा. दीपक पाटील यांनी आपली प्रकृती व आरोग्य सांभाळा असा प्रेमाचा सल्ला देत आनंदी जगण्याचा संदेश दिला. याप्रसंगी शाळेचे लिपिक संदीप टक्केकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तसेच संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी सुद्धा या माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व शेवटी वाकोबा बोकडे यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments