सूचनाफलक रिफ्लेक्टर व दिशादर्शक नसल्याने अपघाताला निमंत्रण,चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथील मोरी बांधकामात ठेकेदाराचा निष्काळजीपणा...
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील नागणवाडी येथील बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर मोरी बांधकाम सुरू असून ठेकेदाराने निष्काळजीपणा दाखवत असल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.वाहनचालकाला नेहमीच्या सवयीने जाण्याची सवय असल्याने सूचनाफलक ,दिशादर्शक, आणि रिफ्लेक्टरचा वापर न केल्याने आतापर्यंत तिघांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. एखाद्या वाहनचालक व्यक्तीचा जीव गेल्यावरच ठेकेदार जागा होणार का? असा संतप्त सवाल वाहन चालकातून होत आहे.
दोन दिवसापूर्वी मोरी साठी खोदलेल्या खड्ड्यात गाडीसह वाहन चालक कोसळा आणि गंभीर जखमी झाला तर काल रात्री एक कुटुंब चंदगड वरून आपल्या गावी परतत असताना रस्त्यावर पडलेल्या बारीक खडीवरून गाडी स्लीप होऊन पती-पत्नी जखमी झाले आहेत. समोर येणाऱ्या गाडीच्या मर्क्युरी लाईटच्या अति प्रकाशामुळे व कामाच्या ठिकाणी रिप्लेटरच्या साईड पट्ट्या न लावल्यामुळे वाचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही शिवाय कामाच्या ठिकाणी गोल बारीक वाळू पसरली असल्याने गाड्या स्लीप होऊन वाहन चालक पडत आहेत. ठेकेदार कामात हलगर्जीपणा करत काम सुरू केल्याने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.एखाद्याच्या विपरीत घटनेनंतर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर ठेकेदार ना समज येणार का ?अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्या बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावरील चंदगड हद्दीत सुरू असल्यामुळे मोरीच्या कामांच्या ठिकाणी पाहणी करून वाहन चालकांना मार्गस्थ होण्यासाठी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी होत आहे.
Post a Comment
0 Comments