Type Here to Get Search Results !

गणांचारी कुटुंबाकडून एक हात मदतीचा.

चंदगड प्रतिनिधी/भरमु शिंदे : कुमार विद्यामंदिर पीळणी शाळेतील कै.श्रीपती भिकाजी गावडे यांची कन्या कु. स्वरा गावडे इयत्ता दुसरीत शिकत असताना तिच्या जीवनातील पितृछाया काळाने तिच्या पासून हिरावून घेतली असून कामावणारा कर्ताच गेल्याने या दुःखात संपूर्ण कुटुंब जगत आहे.दुःखाचा डोंगर तसेच आर्थिक भार घेऊन स्वराला शिक्षण घेणे फार कठीण झाले असून त्यातच शिक्षणासाठी मदत म्हणून गणांचारी कुटुंब पुढे आले.त्यांनी स्वराला शिक्षणासाठी रोख 15,000/ हजार रुपये मदत केली.


यावेळी विजय गणांचारी (सहाय्यक,रोजगार हमी योजना,पंचायत समिती चंदगड ),डॉ. कृष्णा गणांचारी( पशुवैद्यकीय अधिकारी),संजय गणांचारी, डॉ. राऊत अश्या संवेदनशील व दातृत्ववान गणाचारी बंधूंचे विद्या मंदिर पीळणी शाळेला भेट दिली.यावेळी शाळेचा संपूर्ण शिक्षक स्टाफ उपस्थित होता. शिक्षक यांनी गणाचारी कुटुंबांचे आभार मानले व स्वराला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.गणाचारी कुटुंबाने शिक्षणासाठी काही मदत लागल्यास आम्हाला हाक द्यावी असेही आवाहन केले.

Post a Comment

0 Comments