चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : भारतीय बौद्ध महासभा शाखा चंदगड यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार 16 एप्रिल रोजी पाटणे फाटा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व आंबेडकर प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सकाळी पाटणे फाटा ते मजरे कारवे ते पुन्हा पाटणे फाटा पर्यंत चित्ररथ व रॅली निघणार आहे.यानंतर प्रतिमा पूजन, विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी, पत्रकार आदींचा सत्कार समारंभ होणार असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष ग. रा. कांबळे व सचिव एकनाथ कांबळे यांनी दिली आहे.
Post a Comment
0 Comments