Type Here to Get Search Results !

शिव उद्योग सेनेच्या जिल्हा प्रमुख पदी इंद्रायणी बोकमुरकर यांची निवड.

चंदगड/प्रतिनिधी- शिवसेना महिला चंदगड तालुका प्रमुख इंद्रायणी मोनाप्पा बोकमूरकर रा.शिनोळी खुर्द यांची शिव उद्योग सेनेच्या कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली.इंद्रायणी यांनी मागील काळात शिवसेना महिला तालुका प्रमुख म्हणून पक्षाचे चांगले काम केले.व तालुक्यातील असंघटित  कामगारांच्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिल्या. तसेच कामगारांना शासनाच्या योजना मिळवून दिल्या.एकंदरीत या सर्व बाबींचा विचार करून पक्षाने त्यांना वरिष्ठ पातळीवर जबाबदारी दिली आहे.


शिव उद्योग सेनेच्या कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख पदी निवड झाल्याने त्यांना विविध स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.यावेळी नवनिर्वाचित उपजिल्हा प्रमुख इंद्रायणी बोकमूरकर म्हणाल्या,'पक्षाने दिलेली जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडीन.पक्ष वाढीसाठी काम करून जिल्ह्यातील  महिलांना शिव उद्योग सेनेच्या माध्यमातून नव-नवीन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रमाणीकपणे प्रयत्न करेन असे मत त्यांनी मांडले. यावेळी नियुक्ती पत्र देताना शिव उद्योग सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ भिलारे,जिल्हा प्रमुख श्री.कामते ,महिला जिल्हा प्रमुख कांताताई.मोनाप्पा बोकमूरकर व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments