Type Here to Get Search Results !

धबधब्यात बुडून कॉलेज विद्यार्थ्याचा मृत्यू.

चंदगड/प्रतिनिधी : तिलारी (ता. चंदगड) येथील ग्रीन व्हॅलीजवळील धबधब्यात बुडून बेळगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि. ३) उघडकीस आली. अभिनव चंद्रशेखर अंकलगी (वय २१, मूळ गाव वडगेर, ता. यड्रामी, जि. गुलबर्गा) असे त्याचे नाव आहे. याबाबतची वर्दी अभिनवचे वडील चंद्रशेखर अंकलगी (वय ५०) यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, अभिनव हा येथील नामांकित वैद्यकिय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो आपल्या चार मित्रांसह फिरायला तिलारी परिसरात बुधवारी गेला होता. ग्रीनव्हॅलीजवळील धबधब्याच्या ठिकाणी तो मित्रांसह पाण्यात उतरला होता. मात्र, अभिनवला पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच त्याला नीट पोहताही न आल्याने बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला लागलीच शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. यानंतर बुधवारी दुपारपासून चंदगड येथील पास रेस्क्यू फोर्स या टीमने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविली असता दुपारी एक वाजता त्याचा मृतदेह सापडला.

Post a Comment

0 Comments