रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : हातातील टोकदार कड्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी सुरेश यशवंत तानगावडे व सुमित यशवंत तानगावडे ( रा. शिनोळी बुद्रुक ) या संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची फिर्याद वैजनाथ तानगावडे यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी वैजनाथ तानगावडे यांचे चुलत भाऊ राम तानगावडे व आरोपी सुरेश तानगावडे व सुमित तानगावडे यांच्यातील भांडणे रघुनाथ तानगावडे यांनी मिटवली होती.याचा राग मनात धरून फिर्यादी हे शाळेजवळ बसले असताना त्यांना बोलावून घेऊन शिव्या देण्यास सुरुवात केली असता त्यांना समजावून सांगत असताना टोकदार कड्याने मारहाण करून जखमी केल्याची फिर्यादित म्हटले आहे.फिर्याद दाखल झाल्यावर आरोपीवर भा. द. वि.सं.2024 कलम 118(1), 352- 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुरणे करत आहेत.

Post a Comment
0 Comments