Type Here to Get Search Results !

म.ए. युवा समितीचे शुभम शेळके यांच्यावरील कारवाई थांबवा

शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे बेळगाव प्रशासनाला सूचना करण्याची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी:एकीकरण समिती बेळगावचे युवानेते शुभम शेळके यांच्यावरील कारवाई थांबवावी, अशा सूचना बेळगाव प्रशासनाला कराव्यात, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले.


यामध्ये म्हटले, महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी आंदोलनातून प्रतिक्रिया उमटत असतात. गेत्त्या महिन्यात दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद होती, हे या संदर्भातील एक ताजे उदाहरण बेळगाव येथील एकीकरण समितीचे युवानेते शुभम शेळके यांना अशाच एका आंदोलनातून अटक करून कारागृहात पाठवले ते सध्या जामिनावर बाहेर आले आहेत. मराठी भाषिक आणि सीमा समितीच्या नेत्यांचा आवाज दडपण्यासाठी बेळगाव प्रशासनाने आता शुभम शेळके यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्याच्या हालचाली चालविल्याचे समजते. अशा कारवाईमुळे मराठी भाषिकांत पून्हा असंतोष निर्माण होणार असून त्याचे पडसाद आपल्या कोल्हापूर जिल्हातील सीमेवरील भागात उमटणार आहेत. कर्नाटक शासन आणि प्रशासनाकडून सातत्याने दडपशाही आणि अन्याय अत्याचार यामुळे सीमाभागातील मराठी भाषिक त्रस्त आहेत. आपण या प्रश्नासंदर्भात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून शुभम शेळके यांच्यावरील कारवाई थांबविण्याची सूचना करावी याच संदर्भात सीमाभागासाठी नियुक्त मंत्री समितीकडेही तकार मांडणार आहोत, शेळके यांच्यावरील कारवाई थांबली नाही तर शिवसेनेतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल. यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस बेळगाव आणि कोल्हापूर प्रशासने जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 


यावेळी सुनिल शिंत्रे, संभाजी पाटील, हर्षल पाटील, संभाजी भोकरे, जयसिंग टिकले, उत्तम पाटील, बाळासाहेब पाटील, अवधूत पाटील, अविनाश पाटील, विक्रम मुतकेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments