Type Here to Get Search Results !

सर्वगुणसंपन्न विद्यार्थी देशाला महासत्ता बनवेल-डॉ. मधुकर जाधव

 

(व्ही. के. चव्हाण पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कार्वे येथे कार्यशाळा संपन्न)


चंदगड प्रतिनिधी:'स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकासाला अनन्यसाधारण महत्व आहे. जिद्दीला कष्टाची जोड दिल्यास जीवन यशस्वी होते. जीवनाच्या लढाईमध्ये यशापर्यंत पोहचण्यासाठी अहोरात्र कष्ट करा. स्वतःच स्वतःचे ध्येय ठरवून कार्यरत रहा. अहोरात्र कष्ट करून सन्मानाने उभे रहा. बुध्दीमान माणसानीच इतिहास घडविला आहे त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून मोठे व्हा. जो कष्टेल तोच चमकेल. विद्यार्थ्यांना त्यांची वैचारिक आणि नैतिक मुल्ये यशापर्यंत पोहचवितात. प्रत्येकाचे स्वतःचे असे वेगळे व्यक्तिमत्व असते. त्यातुन तो घडत असतो. आई-वडिलांच्या स्वप्नाला ताकद देवून पुढे जा.' असे प्रतिपादन हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहासाचे अभ्यासक व प्रसिध्द वक्ते डॉ. मधुकर जाधव यांनी केले ते व्ही. के. चव्हाण पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कार्वे येथील आयोजित कार्यशाळेत बोलत होते. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. पाटील होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. यु.डी. पाटील प्रा. व्ही. एम. अतवाडकर प्रा. कृष्णा कलजी हे उपस्थित होते.


डॉ. जाधव पुढे म्हणाले , 'आई-वडिलांची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी विद्यार्थ्यांनी अहोरात्र कष्ट करावेत. त्यासाठी मेहनत करा आदर्श व्यक्तिमत्व घडविण्याासाठी सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा असतो. तो अंगीकारणे आवश्यक आहे. यातुन तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळविता येते. तुमचे विचार ही तुमची ओळख असते तुमचे बोलणे व वागणे तुम्हाला ऊर्जा प्राप्त करते. आई-वडिलांचा सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे मुलाचे यशस्वी होणे होय. आयुष्याची वाटचाल करताना योग्य पर्यायाची निवड करा. नेहमी चांगला विचार करा. माणसांच्या मनामध्ये दिवसाला 35 हजार विचार येतात. ते विचार जीवनाच्या यशासाठी वापरा जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ति श्रेष्ठ आहे.


या कार्यशाळेचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. यु. डी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. एस. डी. देशमुख, प्रा. एस. जे. तुपारे, प्रा. कल्पना पाटील, प्रा. सी. एल गावडे, प्रा. प्रदिप कांबळे, प्रा. अजय दळवी, प्रा. एन. एन. शहापूरकर आदि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार प्रा. व्ही. एम आतवाडकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कृष्णा कलजी यांनी केले.

Post a Comment

0 Comments