पुणे/प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे शहराध्यक्षपदी सुरज युवराज खंडाळे यांची निवड करण्यात आली आहे.शिवसेना सह संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर,पुणे शहराध्यक्ष संजय मोरे,गजानन थरकुडे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे महाराष्ट्र चिटणीस फैजान पटेल, पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय घुले यांच्याहस्ते पत्र देण्यात आले.सुरज खंडाळे हे कित्येक वर्षे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून ते नेहमी लोकांच्या प्रश्न सोडवितात. तसेच आपल्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबिवतात. त्यांच्या या निवडीनंतर सर्वच माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
यावेळी उपस्थित रोहित पवार, बाळासाहेब मोहिते, शैलेश मोहिते, रोहित अवघडे, ऋषिकेश जगताप, निरंजन कुचेकर व निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments