Type Here to Get Search Results !

सुंडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात.

चंदगड प्रतिनिधी /रुपेश मऱ्यापगोळ : सुंडी ( ता.) चंदगड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन अद्यक्ष कृष्णा कांबळे व सरपंच मनोहर कांबळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व शिक्षण विस्तार अधिकारी पदी गुंडू यल्लाप्पा कांबळे यांची निवड झाल्याबद्दल मंडळाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


यावेळी शालेय विद्यार्थ्यांना आयुनी संगीता तुकाराम कांबळे यांनी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप केले.यानंतर महिलांनी भीम गीत सादर करून कार्यक्रमात नव ऊर्जा आणली.संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर स्नेहभोजन होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 


यावेळी सरपंच मनोहर कांबळे, उपसरपंच शुभांगी पाटील, पोलीस पाटील वैजनाथ सरसेट्टी, तंटामुक्त अध्यक्ष तानाजी टक्के कर, सोन पांढरचे सीईओ संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण पाटील, धुळाप्पा सरशेट्टी, गावचे ज्येष्ठ नागरिक व आदर्श शिक्षक श्री झिम्माना पाटील सर यांच्यासह श्री व्ही एस पाटील, गावातील सर्व ग्रामस्थ, उपासक उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार श्रीकृष्ण कांबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments