चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : सडेगुडवळे तालुका चंदगड येथे श्री.देव रामलिंग मंदिराचा जीर्णोद्धार व कळशारोहन कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी मुहूर्तमेढ करून रामनवमी साजरी करण्यात आली.7 एप्रिल रोजी देव-देवतांना आवाहन व प्राईस्चित विधी पार पडला.8 एप्रिल रोजी प्रसाद शुद्धी कलश मिरवणूक दिंडी प्रस्थान कार्यक्रम पार पडले.तर 9 एप्रिल रोजी नवग्रह देवता स्थापन,वास्तुदेवता स्थापन, शांती होम इत्यादी कार्यक्रम पार पडले.
गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी महाअभिषेक पूजनानंतर सुरगेश्वर संस्थान मठ कसबा नूल तालुका गडहिंग्लजचे मठाधिपती श्री.गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते कलशारोहण पार पडला.रात्री 10 वाजता श्रीराम दशावतार नाट्य मंडळ सडेगुडवळे यांचा पौराणिक नाट्य प्रयोग सेतुबंध रामेश्वर लिंग स्थापना या नाटकाचा प्रयोग पार पडला. यावेळी पिळणी,कानूर खुर्द, पुंद्रा, धामापूर, कुरणी बुजवडे, भोगोली, बिजूर, महाळुंगे काजिरने उमगाव, झांबरे, मासुरे चौकूळ या गावातील समस्त भाविक उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments