Type Here to Get Search Results !

सुरुते येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार.

चंदगड प्रतिनिधी : सुरुते (ता. चंदगड) येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या माल वाहतूक टेम्पोची दुचाकीस जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. नागोजी धोंडिबा बाळेकुंद्रीकर (वय ७०) असे मृताचे नाव आहे, तर पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी जखमी झाली. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही होण्याची दुर्घटना घडली. याबाबत समजलेली घटना अशी येळेबैल येथील नागोजी बाळेकुंद्रीकर हे आपल्या पत्नीसह नातेवाईकाकडे जात होते. सुरुते - शिनोळी दरम्यानच्या रस्त्यावर सुरुते गावाशेजारील ख्रिश्चन स्मशाना शेजारील धोकादायक वळणावर आले. पाठीमागून ढेकोळी येथील काजू घेऊन येणाऱ्या टेम्पोच्या पाठीमागील फाळक्याच्या अँगलला धडक जोरदार डोकीस बसल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर जोराने पडल्याने ते जागीच ठार झाले. 


घटनेची माहिती चंदगड पोलिसात दिल्यानंतर, पोलीस अपघात स्थळी दाखल झाले. मृतदेह शवच्छिदेन करण्यासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयकडे पाठवण्यात आला. नागोजी बाळेकुंद्री यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


Post a Comment

0 Comments