नेसरी प्रतिनिधी/पुंडलीक सुतार : खासदार बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट रूकडी संचलित श्री.कलमेश्वर विद्यालय सांबरे विद्यालयाचा एस.एस.सी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून मोठ्या प्रमाणात यश या शाळेने प्राप्त केले आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी 40 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.सुप्रिया संजय बसाण हिने 91 टक्के गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम तर नेसरी केंद्रात सहावा क्रमांक पटकावला.मधुरा राजेंद्र पाटील द्वितीय 89.60 ,आवेश रफिक कदिम 87.20 ,अदिती विष्णू महातुकडे 86%, पूजा चाळोबा गावडे ८५.६० ,सलोनी सुभाष टिक्का 85.60 यासह आदी विदयार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्ता मिळवली. या शाळेच्या यशामध्ये मुख्याध्यापक नामदेव पाडले ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.तर संस्था अध्यक्ष माजी खासदार डॉ.निवेदिता माने,संस्था सचिव खासदार धैर्यशील माने यांचे प्रोत्साहन मिळाले.
Post a Comment
0 Comments