चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली. हा सोहळा रविवार दिनांक २५ मे रोजी सकाळी ११:०० वाजता J W Marriot हॉटेल पुणे येथे होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे व आयुष्यमान भारत महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे उपस्थित राहणार आहेत.
पत्रकारांच्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून राज्यातील डिजिटल मीडियाचे सर्व संपादक पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
Post a Comment
0 Comments