कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र व राज्य सरकारकडून दलित समाज व इतर मागासवर्गीय समाजांवर विविध माध्यमातून अन्याय होत आहे.सदरचा अन्याय थांबवण्यासाठी सर्व आंबेडकरी पक्ष संघटना यांच्यामध्ये ऐक्य घडवून आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा याबाबतचे निवेदन केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना ब्लॅक पँथर पक्षाच्यावतीने पक्षाचे देण्यात आले.
ब्लॅक पँथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी कोल्हापूर दौऱ्यावर सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आले असताना त्यांची भेट घेतली. व आदी विषयावर चर्चा करत दलित चळवळीची माहिती दिली.यावेळी पक्षाचे जिल्हा निरीक्षक सुभाष कापसे,जिल्हा महिला अध्यक्षा प्रिती सोरटे,सदस्या उषा पोवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments