चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : चंदगड येथील आगारासाठी नवीन 10 बसेस मिळणार असल्याची माहिती आमदार शिवाजी पाटील यांनी दिली.तालुक्यातील प्रवासी व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून त्यांच्या सोयीसाठी अत्याधुनिक बसेसची गरज आहे. सध्या आगारातील बसेस बहुतांशी जुन्या असून नवीन दहा बस मिळाले तर प्रवासाच्या दृष्टीने ते हितकारक होणार आहे. शेजारील गडहिंग्लज डेपोसाठी पाच नवीन बस आल्या.
चंदगड आगारासाठी पाच नवीन बस स्वीकारणार नसल्याची ठाम भूमिका आमदार शिवाजी पाटील यांनी घेतल्याने परिवहन मंत्र्यांनी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात दहा नवीन बस देण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. या बसेस मुंबई, पणजी, दोडामार्ग व तालुका अंतर्गत प्रवासासाठी वापरण्यात यावे अशी सूचना आमदार पाटील यांनी चंदगड आगाराला दिल्या आहेत.
Post a Comment
0 Comments