Type Here to Get Search Results !

माडवळे येथे ग्रामदैवत रामलिंग देवालय वास्तुशांती व कळशारोहण सोहळा.

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ :  माडवळे ( ता.चंदगड ) येथील ग्रामदैवत रामलिंग देवालय वास्तुशांती व कळशारोहण सोहळा गुरुवार दि. 8 मे ते सोमवार दि.12 मे 2025 पर्यंत आयोजित केल्याची माहिती श्री रामलिंग मंदिर जीर्णोद्धार  समितीने दिली आहे. आठ मे रोजी मुहूर्तमेढ, नऊ मे रोजी वास्तुशांती, दहा मे रोजी कळस व कलश मिरवणूक सोहळा, 11 मे रोजी कळसारोहण व सोमवार दिनांक 12 मे रोजी महाप्रसाद असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजी पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील,माजी आमदार राजेश दादा पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर मंडळी  उपस्थित म्हणून राहणार असून या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी  घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments