Type Here to Get Search Results !

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या काश्मिरी तरुणाची आत्महत्या.

मुंबई/प्रतिनिधी : पहलगाममध्ये 22 एप्रिल 25 रोजी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा बळी गेला आहे.या हल्ल्यात पाच सशस्त्र इस्लामी अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.पर्यटक झिपलाइन राइड करत असताना अतिरेक्यांनी हल्ला केला आहे.या दुर्दैवी घटनेत बहुसंख्य हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण गंभीर जखमी झालेत. यामध्ये दहशदवाल्यांना मदत केलेल्या काश्मीरमधील अनेकांची सुरक्षा दलांकडून जोरदार चौकशी मोहिम सुरु आहे. 


यामध्ये चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या एका काश्मिरी तरुणाचा मृतदेह नदीकिनारी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.रविवारी सकाळी काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अहरबल भागातील अदबल नाल्यातून इम्तियाज अहमद मगरे या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. दरम्यान, इम्तियाजचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सुरक्षा दलांपासून पळून जावून त्याने नदीत उडी मारल्याने तो वाहून गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते.इम्तियाजवर दहशतवाद्यांना जेवण पुरवल्याचा आणि त्यांची राहण्याची व्यवस्था केल्याचा आरोप होता. सध्या या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments